रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. जिनिलीयाचं मराठीमध्ये पदार्पण तर रितेशचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवरही ‘वेड’चा बोलबाला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : खऱ्या आयुष्यात आलिशान घरात राहते ‘तू तेव्हा तशी’मधील अनामिका, शिल्पा तुळसकरनेच शेअर केला व्हिडीओ

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चार दिवसांमध्येच कोट्यावधी रुपयांचा पल्ला गाठला आहे. आतापर्यंत ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर १३ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. तसेच प्रेक्षकही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. रितेशची आई व दोन्ही मुलांनी हा चित्रपट पाहिला.

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रितेशने ‘वेड’ चित्रपट पाहिल्यानंतर आईची प्रतिक्रिया काय होती? याबाबत भाष्य केलं आहे. रितेश म्हणाला, “माझी आई हा चित्रपट पाहून अगदी भावूक झाली. चित्रपट चांगला असो वा वाईट आईची प्रतिक्रिया ही नेहमीच चांगलीच असते.”

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

जिनिलीयाने रियान आणि राहील या त्यांच्या दोन मुलांनी चित्रपट पाहून काय प्रतिक्रिया दिली याबाबत सांगितलं. ती म्हणाली, “आमचा हा पहिलाच चित्रपट आमच्या मुलांनी पाहिला. या चित्रपटामध्ये एक सीन आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा मला आई म्हणून हाक मारतो. ते पाहून माझ्या मुलांना खूप दुःख झालं. तुला दुसरं कोणी आई म्हणून हाक कसं मारतं? असं ते मला विचारू लागले. शिवाय घरातही दोघं ‘वेड लाव वेड लाव’ गाण्यावर डान्स करत असतात.” ‘वेड’ चित्रपट आता आणखी कितपत कमाई करणार? हे पाहावं लागेल.

Story img Loader