रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. जिनिलीयाचं मराठीमध्ये पदार्पण तर रितेशचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवरही ‘वेड’चा बोलबाला पाहायला मिळत आहे.
चित्रपट समीक्षत तरण आदर्शने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘वेड’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ने बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये गल्ला जमावला. रविवारी ४ कोटी ५० लाख तर सोमवारी ३ कोटी रुपये ‘वेड’ चित्रपटाने कमावले. एकूण आतापर्यंत १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली.
आणखी वाचा – मुलगा ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी घरी आणणार का? पहिल्यांदाच शिव ठाकरेच्या आईने दिलं उत्तर, म्हणाली, “माझा लेक…”
‘वेड’ चित्रपटाच्या तुलनेत इतर बॉलिवूड चित्रपटांची जादू मात्र फिकी पडली. रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यामध्ये सोमवारी (२ जानेवारी) फक्त ७५ लाख रुपये कमाई केली. म्हणजेच हिंदी चित्रपटालाही मागे टाकत रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे.