रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. अवघ्या २० दिवसांत ‘वेड’ चित्रपटाने ५० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरुच आहे. या चित्रपटाने अनेक मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू पडद्यावर कायम आहे. महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या या चित्रपटाची विक्रमी कमाई पाहून मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही भारावला आबे. ‘वेड’ चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमावल्यानंतर रितेश व जिनिलीयाने पोस्टर शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले होते. हे पोस्टर सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर करत रितेश व जिनिलीयाचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा>> “जगातील सगळ्यात…”, पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राखी सावंतची पहिली पोस्ट

हेही वाचा>> “मराठी माणसांच्या…”, गौरव मोरेसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट
सिद्धार्थची स्टोरी रितेश देशमुखने रिपोस्ट केली आहे. “लव्ह यू सिद्धू”, असं म्हणत रितेशने सिद्धार्थचे आभार मानले आहेत. रितेशने ‘वेड’ चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने तिने तब्बल दहा वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.
हेही वाचा>> ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”
रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट एका दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘सैराट’ व ‘लय भारी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्डही मोडला आहे.