रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ चित्रपटाची यशस्वी घौडदोड सुरू आहे. लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा गाठणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी वाटचाल करत असताना रितेश देशमुखने चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे.

‘वेड’ चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबाबत रितेशने इन्टाग्राम लाइव्हद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. याबरोबरच रितेशने चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच २० जानेवारीपासून ‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजेच चित्रपटातील एडिट केलेलं काही सीन या चित्रपटात दाखवून ‘वेड’ पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबरेबरच श्रावणी व सत्याचं एक रोमॅंटिक गाणंही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसंच चित्रपटाच्या शेवटी दिसणारं सलमान खान व रितेशचं गाणंही चित्रपटाच्या या नवीन व्हर्जनमध्ये दाखविण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटात हे बदल केलं असल्याचं, रितेशने सांगितलं आहे.

Govinda
३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Navri Mile Hitlarla
“दोघांचं भांडण…”, अनोळखी मन्याच्या ‘त्या’ कृतीमुळे लीला-एजेमध्ये येणार दुरावा? नेटकरी म्हणाले, “ट्विस्ट छान आहेत; पण…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

हेही वाचा>>रितेश देशमुखने मनसे नेत्याच्या मुलाकडे केली ‘वेड लावलंय’ गाण्यावर व्हिडीओ बनवण्याची मागणी; पुढे काय घडलं पाहा

हेही वाचा>> ‘घर मोहे परदेसिया’ गाण्यावर थिरकली मुकेश अंबानींची धाकटी सून; मेहेंदी सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

रितेशने ‘वेड’ चित्रपटाबाबत आणखी एक घोषणा त्याच्या इन्स्टाग्राम लाइव्हमधून केली आहे. २० जानेवारीला ‘वेड’ चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार आहे. शुक्रवारी २० जानेवारीला सिनेमा लव्हर्स डे सेलिब्रेट करण्यात येणार असल्यामुळे सगळे चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार आहेत. त्यामुळे वेड चित्रपटाचं तिकिटंही अवघ्या ९९ रुपयांत मिळणार असल्याचं रितेशने सांगितलं आहे.

हेही वाचा>>“…म्हणून मी चांगली आई झाले”, जिनिलीया देशमुखने मुलांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

‘वेड’ या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून या निमित्ताने तिने तब्बल १० वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.

Story img Loader