रितेश देशमुख-जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिवर जादू कायम आहे. तीन आठवड्यात या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला. ‘वेड’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद व प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हा चित्रपट काही बदलासंह पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता.
‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन २० जानेवारीला प्रदर्शित करण्यात आलं. यामध्ये चित्रपटातील काही एडिट केलेले सीन आणि सत्या व श्रावणीचं नवीन रोमँटिक गाणं दाखविण्यात आलं होतं. चित्रपटातील सत्या व श्रावणीचं ‘वेड तुझा’ हे रोमँटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘देश म्युझिक’ या युट्यूब चॅनेलवरुन हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहेत.
हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या एक मिलियनपेक्षा जास्त तिकिटांची विक्री; प्रदर्शनाआधीच कमावले ‘इतके’ कोटी
हेही वाचा>> पंतप्रधान मोदींच्या अंदमान-निकोबारवरील २१ बेटांच्या नामकरणाच्या निर्णयाचं अजय देवगणने केलं कौतुक, म्हणाला…
‘वेड तुझा’ या चित्रपटातील मूळ गाण्याचे शब्द बदलण्यात आलेले नाहीत. सत्या व श्रावणीवर हे गाणं पुन्हा चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यातून सत्या व श्रावणीची केमिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर रितेश-जिनिलीयाचा ऑनस्क्रीन रोमान्सही गाण्यात पाहायला मिळत आहे. ‘वेड’ चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही पाहा>> Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी
‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.