रितेश देशमुख हा मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. पण आता त्याच्या एका पोस्टमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
रितेश देशमुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतो. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी तो चाहत्यांशी सोशल मीडियावरून शेअर करत असतो. आता त्याने एका ऑनलाईन गेमिंग ॲपची जाहिरात केली. हा त्याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. पण त्याने ही जाहिरात केल्याचं नेटकऱ्यांना खटकलं.
रितेशने नुकताच त्याचा इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तो एका गेमिंग अॅपवर लुडो खेळताना दिसत आहे. हे गेम्स खेळून तुम्ही भरपूर पैसे जिंकू शकाल असंही त्याने म्हंटलंय. मात्र त्याने केलेली ही जाहिरात नेटकऱ्यांना आवडलेली नाही. आता त्यावरून नेटकरी त्याला ट्रोल करू लागले आहेत.
हेही वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “आता कुठे मी तुमचा चाहता झालो होतो आणि तुम्ही हा व्हिडीओ टाकून सगळी मजा खराब करून टाकली. कृपया हे अॅप्स प्रमोट करू नका.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “सर, आम्ही तुम्हाला खूप मानतो. तुम्ही अशा जाहिराती करू नका.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “दादा, ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. प्रत्येक वेळी आपणच जिंकणार अशी अपेक्षा ठेवणारा गेम म्हणजे जुगारच.” “लोक तुमच्याकडून काहीतरी शिकतील अशा जाहिराती करत जा. या जाहिराती का करता…त्या रजनीकांतकडून शिका जरा,” असंही एक नेटकरी म्हणाला. आता त्याचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.