Riteish Deshmukh : विधानसभा निवडणुकीला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आज ( १८ नोव्हेंबर ) सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तत्पूर्वी अभिनेता रितेश देशमुखने त्याचे थोरले बंधू व लातूर शहर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुखांसाठी सभा घेतली आहे. या सभेत अभिनेत्याने तमाम लातूरकरांना आवाहन केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रितेशने काही दिवसांपूर्वी त्याचे धाकटे बंधू धीरज देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघात सभा घेतली होती. आज रितेश मोठ्या भावाच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. लातूर शहरात झालेल्या मतदारसंघात अभिनेत्याने युवकांशी संवाद साधला. तसेच अमित देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन त्याने या सभेदरम्यान केलं आहे.
रितेशने या सभेत जबरदस्त डायलॉगबाजी केली आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या सभेत अभिनेता नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…
“लातूर शहराचा हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे झालेला एकच ‘बिग बॉस’ आहे आणि ते म्हणजे आमचे अमित भैया. आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा प्रत्येकाला आपल्याला सुरक्षित वाटलं पाहिजे…आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा प्रत्येकासाठी सुरक्षितता महत्त्वाची असते. ही सुरक्षितता विलासराव देशमुख साहेबांपासून आहे. बाहेरुन येणार्या प्रत्येकाला लातूर शहर आपलंसं, सुरक्षित वाटलं पाहिजे आणि हाच वारसा अमित भैयांनी सुद्धा जपला आहे. त्यांनी १५ वर्षे खूप काम केलंय आणि यापुढे सुद्धा करत राहतील. तुमची सर्वांची स्वप्न भैया नक्की साकार करतील. आपला उमेदवार एक नंबर, लिस्टमध्ये नाव एक नंबर आणि महाराष्ट्रामध्ये लीड पण एक नंबर लागली पाहिजे. हे लातूर आहे पिल्लू…लातूरचा इंगा अजून बघितला नाहीये लोकांनी…आणि तो इंगा आता दाखवायची वेळी आली आहे. भैया तुम्ही म्हणता, तुम्हाला विरोधकांचं नाव घ्यायचं नाहीये कारण, त्यांना तुम्हाला चर्चेत आणायचं नाहीये. पण, ही गर्दी पाहून ती चर्चा संपली. युवकांची साथ असते त्याचा विजय निश्चित असतो हे तुम्ही सगळे येत्या २० तारखेला करून दाखवा.” असं आवाहन रितेश देशमुखने लातूरकरांना केलं आहे.
दरम्यान, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापूर्वी सलग तीन वेळा त्यांनी निवडणूक जिंकली आहे. यावेळी त्यांच्यासमोर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील यांचं आव्हान असणार आहे.