अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत, अनेक मुलाखती देत ते या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यांच्या कामाप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयष्यामुळेही त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जात असतं. अनेकदा ते त्यांच्या मुलांबरोबर विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. दरवेळी त्यांची दोन्ही मुलं फोटोग्राफर्सना बघून हात जोडताना दिसतात. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचं सगळेजण नेहमीच कौतुकही करतात. ते असं का करतात यांचं कारण आता रितेश आणि जिनिलियाने उघड केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश आणि जिनिलीया त्यांच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटानिमित्त बातचीत करण्यासाठी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी तुमच्या चित्रपटाबद्दल तसच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांना “तुमची दोन्ही मुलं प्रत्येक वेळी फोटोग्राफर्सना हात जोडून नमस्कार करताना दिसतात. त्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं जातं. बद्दल तुम्ही काय सांगाल आणि पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा : “ही फक्त सुरुवात आहे…” मानसी नाईकच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या प्रश्नाचे उत्तर देताना रितेशने यामागची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “एकदा मला माझ्या मुलांनी विचारलं, “ते तुमचे फोटो का काढतात?” त्यावर मी त्यांना म्हणालो की, “तुमचे आई-बाबा जे काम करतात त्यासाठी ते येऊन आमचे फोटो काढतात. तुम्ही आमची मुलं आहात आणि त्यामुळे तुमचेही फोटो काढले जातात. म्हणून तुम्ही फक्त हात जोडून त्यांचे आभार मानायचे. आत्तापर्यंत तुम्ही असं काहीही मिळवलेलं नाही की ज्यामुळे तुमचे फोटो काढले जावेत. तरीही ते येऊन तुमचे फोटो काढतात त्याबद्दल तुम्ही त्यांना हात जोडून धन्यवाद म्हणायचं.” माझं हे म्हणणं त्यांना पटलं आणि ते म्हणाले की, “हो बाबा आम्ही त्यांचे हात जोडून आभार मानू” आणि तेव्हापासून ते फोटोग्राफर्स आणि मीडियासमोर आल्यावर सर्वांना हात जोडून नमस्कार करतात.”

हेही वाचा : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

दरम्यान त्यांच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे. तसेच या चित्रपटातून अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh open ups about their childrens genuine behavior rnv