अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया सध्या त्यांच्या ‘वेड’ या नवीन मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघेही चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यग्र आहेत. रितेश आणि जिनिलीया अनेक वर्षांनी एकत्र एकाच चित्रपटात दिसणार आहेत. त्यातच या जोडप्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये दोघेही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ट्रेलर आणि गाण्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच रितेशने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपले पालक कधीच चित्रपटांच्या सेटवर आले नाहीत, याबद्दल खुलासा केला. रितेश देशमुख महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. रितेश मुलाखतीत म्हणाला, “तब्बल २० वर्षे झालीत मी काम करतोय. या २० वर्षांत माझ्या आई माझ्या सेटवरती कधीही आल्या नाहीत. माझे वडीलही कधी सेटवरती आले नाहीत. त्यांनी सेटवर यायचं म्हटलं तर प्रोटोकॉल आणि इतर गोष्टी यायच्या. शिवाय ज्या कामासाठी ते आले असते, तेच शूटिंगचं काम थांबलं असतं, त्यामुळे आई कधीच आल्या नाहीत,” असं रितेशने सांगितलं.

रोड शोमध्ये तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी; प्रसिद्ध अभिनेत्रीने स्कुटीवरून अनवाणी काढला पळ, Video Viral

पुढे रितेश म्हणाला, “एकेदिवशी मी आईला विचारलं की आई, तुम्ही कधीच माझ्या सेटवरती आल्या नाहीत. तेव्हा त्या सहज म्हणाल्या, तू कधी बोलावलंच नाहीस. मग मला वाटलं, इतके वर्ष आपण काम करतोय. जवळपास ४०-५० चित्रपट झाले असतील. आपण आईंनाच सेटवर बोलावलं नाही कधी. मग ती गोष्ट माझ्या डोक्यात होती. मी विचार केला की पहिल्यांदा जेव्हा मी आईंना सेटवर बोलवेन, तर वेडच्या शूटलाच. मग मी मुहूर्त शॉटसाठी आईंना बोलावलं. माझ्या आयुष्यातलं दिग्दर्शनाचं मोठं पाऊल, शिवाय मी आणि जिनिलीया दोघेही शॉटमध्ये होतो, अजय-अतुल यांचं गाणं चालू होतं आणि आईंनी मुहूर्त शॉट दिला. मुलगा रियान अॅक्शन म्हणतोय, राहील कट म्हणतोय. शूटच्या त्या पहिल्या दिवशी जिनिलीयाच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाईंचा वाढदिवस होता. त्यादिवशी या सगळ्या गोष्टी एकाच वेळी जुळून आल्या होत्या,” असं रितेशने सांगितलं.

रितेश-जिनिलियाच्या गाण्याने काजोललाही लावलं ‘वेड’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली “निस्वार्थ प्रेमापेक्षा…”

दरम्यान, रितेश व जिनिलीया मुख्य भूमिकेत असलेला ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबरला राज्यभर प्रदर्शित होणार आहे. हा जिनिलीयाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटातून ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh parents never came on his movie set he did marathi movie ved mururat shot after her complaint genelia hrc