मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती आज प्रचंड खालावली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत. सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “मला विचित्र, घाणेरड्या कमेंट्स दिसल्या की…”, अमृता खानविलकर ट्रोलर्सची ‘अशी’ घेते शाळा; म्हणाली, “मी थेट…”

राजकीय क्षेत्रासह आता मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात मनोरंजनविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. किरण माने, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे या कलाकारांपाठोपाठ आता अभिनेता रितेश देशमुखने यासंदर्भात ट्वीट (एक्स) करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली ३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री, सुपरहिट चित्रपटांसह मालिकांमध्ये केलंय काम

रितेश या ट्वीटमध्ये लिहितो, “जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.”

हेही वाचा : “घरात पाऊल ठेवायच्या आधी…”, ‘हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावच्या लेकाचा आईसाठी नवा नियम! अभिनेत्री म्हणते, “मला गर्व…”

रितेश देशमुखने शेअर केलेल्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी “जय शिवराय दादा! आपण समाजासाठी व्यक्त झाला बरं वाटत आहेत.”, “एक मराठा… लाख मराठा..” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच काहींनी “त्यांची प्रत्यक्ष भेट घ्या…” असा सल्ला अभिनेत्याला दिला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh reacts on manoj jarange patil maratha reservation protest shared tweet sva 00