मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा लाडका अभिनेता रितेश देशमुखचा शनिवारी(१७ नोव्हेंबर) वाढदिवस होता. रितेशच्या वाढदिवशी सोशल मीडियावरुनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर पत्नी जिनिलिया व कुटुंबियांकडून रितेशला एक खास सरप्राइजही मिळालं.

रितेशच्या वाढदिवसासाठी जिनिलियाने घरातच सरप्राइज प्लॅन केलं होतं. नुकत्याच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलेल्या मिस्टर दिग्दर्शकासाठी घरातील रुम सजविण्यात आली होती. या रुममध्ये ‘वेड’ चित्रपटाचे पोस्टरही लावण्यात आले होते. रितेशच्या मुलांकडूनही त्याला कवितेच्या रुपात छान गिफ्ट मिळलं. आईने औक्षण केल्यानंतर रितेशने कुटुंबियांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. बर्थडे सरप्राइजचा व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य

हेही वाचा>>‘हास्यजत्रे’तील कोहली फॅमिलीवर चाहत्यांनी बनवला रील; समीर चौगुलेंनी स्वत:च शेअर  केला व्हिडीओ, म्हणाले…

हेही पाहा>>“महाराजांचे नाव घेऊन सनातनी हिंदूला मारणे, हे…” केतकी चितळेचं वक्तव्य चर्चेत

“जिनिलिया माझा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत. मी भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी मैत्रीण व साथीदार मिळाली. तू माझं प्रेम आहेस..तू माझं वेड आहेस”, असं कॅप्शन रितेशने शेअर केलेल्या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>>“…म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावंसं वाटतं”, मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत

‘वेड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader