रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख कलाविश्वातील बहुचर्चित कपल आहे. या दोघांकडे एक आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. सध्या रितेश व जिनिलीया त्यांच्या ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. रितेशने या मराठी चित्रपटामध्ये दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटानिमित्त ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती.

आणखी वाचा – लग्न झालं तरीही बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नाना पाटेकरांचं होतं अफेअर, दुसऱ्या लग्नाची बोलणी सुरू होताच…

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. या मुलाखतीदरम्यान रितेशने त्याच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. चित्रपट करत असताना त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याचा तुम्ही विचार करता का? असा प्रश्न रितेशला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी रितेशने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं.

पाहा व्हिडीओ

तो म्हणाला, “या चित्रपटामधील माझा लूक पाहून माझ्या मुलांनी मला विचारलं की तुमच्या तोंडामध्ये काय आहे. सिगरेट म्हणजे काय? असंही विचारलं. आम्ही लोकांच्या तोंडामध्ये हे पाहिलं आहे अशी माझी मुलं मला म्हणाली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपण हे काही करत नाही. शिवाय आम्ही दोघंही सिगरेट व दारू पीत नाही.”

आणखी वाचा – Video : मांडीवर बसून घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; बॉयफ्रेंडने प्रपोज करताच ‘कुछ कुछ होता है’मधली अंजली भारावली, व्हिडीओ व्हायरल

एखाद्या गोष्टीबाबत रितेश व जिनिलीयाला त्यांच्या मुलांनी प्रश्न विचारताच ते त्याचं खरं उत्तर त्यांना देतात. शिवाय रितेश व जिनिलीया दोघंही निर्व्यसनी असल्याचं यामधून स्पष्ट झालं. बॉलिवूडमधील हे आदर्श कपल त्यांच्या मुलांनाही देत असलेली वागणूक व संस्कार खरंच कौतुकास्पद आहे.

Story img Loader