कलाविश्वातील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख ‘वेड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आज(३० डिसेंबर) रोजी त्यांचा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिनिलीयाने हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तिने पाच भाषांमध्ये काम केलं आहे. रितेश व जिनिलीयाने ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डाला हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. जिनिलीयाने मुलाखतीत तिला मराठी शिकवण्यात सासूबाईंचा फार मोठा वाटा असल्याचं सांगितलं.

हेही वाचा>>हार्दिक पंड्या दिसणार ‘केजीएफ ३’मध्ये? ‘रॉकी भाई’बरोबरच्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

जिनिलीया म्हणाली, “लग्नाआधी मला मराठी येत नव्हतं. मला फक्त मराठी वाचता आणि लिहिता येत होतं, पण बोलता येत नव्हतं. लग्नानंतर सासूबाईंबरोबर मी रोज मराठीत बोलायचे. अजूनही मला चांगलं मराठी बोलता येत नाही. मराठी बोलताना अनेक व्याकरणाच्या चुका माझ्याकडून होतात. पण मला खात्री आहे की, एक दिवस मी उत्तम मराठी बोलायला शिकेन. त्यासाठी मी खूप प्रयत्नही करत आहे”.

हेही वाचा>>“धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर…”, तुनिषाच्या आईचे शिझान खान व कुटुंबियांवर गंभीर आरोप

(रितेश देशमुख आईला जिनिलीयाच्या मास्तरीणबाई का म्हणाला? पाहा १९.०७-२२.०० मिनिटे)

“चित्रपटाच्या डबिंगच्या वेळीही रितेशने मला खूप मदत केली. मला घाईघाईत डबिंग करायचं नव्हतं. मला मराठी शिकवण्यात माझ्या सासूबाईंचा फार मोठा वाटा आहे. आता पण मुलाखत बघितल्यानंतर त्या मला अनेकदा काही चुकलं असेल तर सांगतात”, असंही पुढे जिनिलीया म्हणाली. यावर रितेशने “घरात मास्तरीणबाई असल्यावर काय होणार”, असं म्हटल्यावर एकच हशा पिकला.

हेही पाहा>> Rishabh Pant Accident: उर्वशी रौतेलाने पांढऱ्या ड्रेसमधील फोटो केला शेअर; नेटकरी म्हणतात “त्याचा अपघात…”

रितेश व जिनिलीयाने ‘वेड’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशोक सराफ, शुभांकर तावडे हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh said my mom is marathi teacher of genelia ved movie promotion digital adda video kak
Show comments