अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या निरागसपणामुळे कायमच चर्चेत असते. चाहते असो अथवा मित्रमंडळी; ती सर्वांशीच उत्स्फूर्तपणे संवाद साधताना दिसते. पण आता अशातच तिचा आणि रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ते दोघं मराठीत एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याच्या ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाने प्रेक्षकांबरोबरच हिंदी कलाकारांनाही भुरळ घातली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स या चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अशातच ‘वेड’बद्दल रितेशने साराला एक प्रश्न विचारला पण तिच्या उत्तराने रितेश पूर्ण चक्रावून गेला.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत रितेश साराजवळ येऊन तिला विचारतो, “तुम्हाला कुठल्या गोष्टीचं वेड आहे?” त्यावर सारा म्हणते, “नॉक नॉक जोक्स.” तिच्या या उत्तरावर रितेश आश्चर्य व्यक्त करतो. पुढे सरा प्रात्यक्षिक देताना म्हणते, “नॉक नॉक.” त्यावर रितेश म्हणतो, “कोण आहे?” सारा लगेच म्हणते, “अगरवाल.” त्यावर गोंधळून गेलेला रितेश तिला विचारतो, “कोण अगरवाल?” त्यावर सारा म्हणते, “अगर वाल नहीं होती तो घर गिर जाता.” तिच्या या जोकवर रितेश वैतागतो आणि तिला म्हणतो, “काय वेडी आहेस तू!” त्यावर सारा म्हणते, “जसं तुम्ही वेडे.” सारा आणि रितेशचं हे मजेदार भांडण नेटकऱ्यांनाही चांगलंच आवडलं आहे. त्यांचा भांडणाचा हा गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा

दरम्यान ‘वेड’ या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं तर जिनिलीयाने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रदर्शनानंतर आठवड्याभरातच या चित्रपटाने कमाईचा एकूण २० कोटींचा आकडा पार केला. तर सर्वत्र या चित्रपटाचे शो हाउसफुल होताना दिसत आहेत.

Story img Loader