अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या निरागसपणामुळे कायमच चर्चेत असते. चाहते असो अथवा मित्रमंडळी; ती सर्वांशीच उत्स्फूर्तपणे संवाद साधताना दिसते. पण आता अशातच तिचा आणि रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ते दोघं मराठीत एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याच्या ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाने प्रेक्षकांबरोबरच हिंदी कलाकारांनाही भुरळ घातली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स या चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अशातच ‘वेड’बद्दल रितेशने साराला एक प्रश्न विचारला पण तिच्या उत्तराने रितेश पूर्ण चक्रावून गेला.
आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओत रितेश साराजवळ येऊन तिला विचारतो, “तुम्हाला कुठल्या गोष्टीचं वेड आहे?” त्यावर सारा म्हणते, “नॉक नॉक जोक्स.” तिच्या या उत्तरावर रितेश आश्चर्य व्यक्त करतो. पुढे सरा प्रात्यक्षिक देताना म्हणते, “नॉक नॉक.” त्यावर रितेश म्हणतो, “कोण आहे?” सारा लगेच म्हणते, “अगरवाल.” त्यावर गोंधळून गेलेला रितेश तिला विचारतो, “कोण अगरवाल?” त्यावर सारा म्हणते, “अगर वाल नहीं होती तो घर गिर जाता.” तिच्या या जोकवर रितेश वैतागतो आणि तिला म्हणतो, “काय वेडी आहेस तू!” त्यावर सारा म्हणते, “जसं तुम्ही वेडे.” सारा आणि रितेशचं हे मजेदार भांडण नेटकऱ्यांनाही चांगलंच आवडलं आहे. त्यांचा भांडणाचा हा गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा
दरम्यान ‘वेड’ या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं तर जिनिलीयाने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रदर्शनानंतर आठवड्याभरातच या चित्रपटाने कमाईचा एकूण २० कोटींचा आकडा पार केला. तर सर्वत्र या चित्रपटाचे शो हाउसफुल होताना दिसत आहेत.