रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्यासाठी त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट खूप खास ठरला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं तर जिनिलीयाने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटासाठी या दोघांनीही प्रचंड मेहनत घेतली. आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी ‘वेड’ चित्रपटातील कामासाठी एकमेकांचं कौतुक केलं आहे. आता रितेशने सोशल मीडियावरून पत्नीची स्तुती केली.

‘वेड’ या चित्रपटावर सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाच्या कथेने, दिग्दर्शनाने, चित्रपटातील गाण्यांनी, कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. या चित्रपटात जिनिलीयाने ‘श्रावणी’ ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसादाबद्दल जिनिलीयाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. एक व्हिडीओ पोस्ट करत तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले होते. आता जिनिलीयाची हीच पोस्ट रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

आणखी वाचा : “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये जिनिलीयाने लिहिलं होतं, “रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.” आता तिचा हा व्हिडीओ रितेशने शेअर केला आणि लिहिलं, “आमची जिनिलीया…तुमची श्रावणी.”

हेही वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा

या चित्रपटाची चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरू आहे. प्रदर्शनानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने कमाईचा एकूण दहा कोटींचा आकडा पार केला. तर सर्वत्र या चित्रपटाचे शो हाउसफुल होताना दिसत आहेत.

Story img Loader