अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत, अनेक मुलाखती देत ते या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यांच्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी असताना रितेश मनोरंजन सृष्टीत आला. यामुळे काही वेळा त्याला घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही ट्रोल केलं गेलं. आता रितेश नाही त्याच्या या निर्णयामागचं उत्तर सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या चित्रपटाचं रितेश आणि जिनिलीया अनेक दिवसांपासून प्रमोशन करत होते. या दरम्यान ‘झी 24 तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत रितेशला त्यांच्या घरात राजकारण असूनही मनोरंजन सृष्टीत येण्याच्या त्याच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने हा निर्णय का घेतला आणि तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती हेही त्याने सांगितलं.

आणखी वाचा : “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

तो म्हणाला, “मी मनोरंजन सृष्टीत आज जो काही आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. कारण त्यांनी कधीही त्यांच्या इच्छा, अपेक्षा आमच्यावर लादल्या नाहीत. राजकारणातच आलं पाहिजे असं त्यांनी मला किंवा माझ्या भावाला कधीही सांगितलं नाही आणि कधी आम्हाला त्याप्रमाणे वाढवलंही नाही. मला या क्षेत्राची आवड असल्याने मी या क्षेत्रात आलो. मी चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मला पाठिंबाच दिला. पण मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं.”

पुढे तो म्हणाला, “पण ज्यावेळी लोक कौतुक करतात त्याचवेळी काहीजण टीका करणारे असतात. हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला काम दिलं जातं, मुख्यमंत्री निर्मात्यांना फोन करून आपल्या मुलाला चित्रपटात घेण्यासाठी सांगतात असंही बोललं गेलं. पण आजपर्यंत कधीही माझ्या वडिलांनी कोणत्याही निर्मात्याला फोन केलेला नाही. मला विलासराव देशमुख यांचा फोन आला होता असं एकही निर्माता तुम्हाला म्हणणार नाही.”

हेही वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं

दरम्यान त्यांच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे. तसेच या चित्रपटातून अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh told why he joined entertainment field rnv