जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी कायम चर्चेत असते. दोघेही अलीकडेच जोडीने अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाले होते. रितेश-जिनीलायाच्या जामनगरमधील सुंदर फोटोंनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच महाराष्ट्राच्या या लाडक्या दादा-वहिनींचा विमानतळावरचा नवीन व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश आणि जिनिलीयाचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या पापाराझी पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी सर्वाधिक लक्ष अभिनेत्याच्या अनोख्या जॅकेटने वेधून घेतलं. रितेशच्या जॅकेटवर मराठीमध्ये “आला आला भाऊ…” असं लिहिण्यात आलं होतं.

हेही वाचा : स्वप्नील जोशीची पहिली निर्मिती असलेल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, मुक्ता बर्वे व नम्रता संभेरावच्या हटके लूकने वेधलं लक्ष

अभिनेत्याने परिधान केल्यावर डेनिम जॅकेटवर पुढच्या बाजूला “आला आला”, तर मागच्या बाजूला वाघाच्या चित्राबरोबर “भाऊ…” असं लिहिलेलं आहे. सध्या रितेशच्या या हटके जॅकेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : रिंकू राजगुरूच्या आईला पाहिलंत का? हुबेहूब आईसारखी दिसते अभिनेत्री, महिला दिनानिमित्त शेअर केलेले फोटो चर्चेत

महाराष्ट्रासह बॉलीवूडच्या या लाडक्या जोडीचा हा क्यूट व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत या जोडीचं भरभरून कौतुक आहे. “जोडी नंबर १”, “यांची जोडी खरंच एक नंबर आहे”, “दादा वहिनी” अशा कमेंट्स या व्हिडीओवर युजर्सनी केल्या आहेत.

रितेश देशमुख

दरम्यान, याशिवाय दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच शिवजयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार असून, जिनिलीया या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh unique jacket grabs all attention at airport video viral sva 00