बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाची चर्चा अद्याप कायम आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले आहेत. मात्र तरीही या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. या चित्रपटात झळकलेली बालकलाकार खुशी हजारेच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

वेड चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेल्या खुशी हजारेला नुकतंच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अभिनेत्री सायली संजीवबरोबर फोटो पोस्ट केला आहे. यात त्या दोघींच्याही हातात पुरस्कार पाहायला मिळत आहे. याला तिने छान कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “सिनेसृष्टीत कायमच गटबाजी पाहायला मिळते”, मराठी अभिनेत्रीचे वक्तव्य, म्हणाली “‘आटपाट’ प्रोडक्शनमध्ये…”

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर

‘”वेड’लावणारी ‘गोष्ट एका फिल्मफेअरची’

सायली संजीव मॅडम आणि माझ्या चेहऱ्यावर हा आनंद असण्याचे एक खास कारण आहे. आज आम्हाला दोघींना आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सायली मॅडमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ‘गोष्ट एका पैठणीची’साठी आणि मला सर्वोत्कृष्ट बालकलाकार ‘वेड’साठी. आम्ही हा फोटो काढत असताना त्या particular area मध्ये उजेड खुपचं कमी होता, पण जसा कॅमेरा चालू केला तिथले लाईट्स पण चालू झाले. त्या दिवशी आमचे नशीब खऱ्या अर्थाने उजळले”, असे खुशीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझे वडील रिक्षा चालवायचे, आई घरी शिवणकाम करायची; पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे…” शिवाली परबचा खुलासा

दरम्यान, बालकलाकार खुशी हजारे हिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. फक्त मराठीच नव्हे तर तिने बॉलिवूडमध्येही काम केलंय. ‘भूत’, ‘आपडी थापडी’, ‘वजनदार’, ‘प्रवास’, ‘सरबजीत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खुशीने अभिनय केला आहे. तिने जवळपास १३ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader