रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. तर या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. पहिल्या विकएण्डला या चित्रपटाने यशस्वी कामगिरी केली आहे.

या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं या त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलीया प्रेक्षगकांचं मन जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. अनेक दिवस रितेश आणि जिनिलीया त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. तीन दिवसातच या चित्रपटाने १० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे.

IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”

आणखी वाचा : “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी २.२५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी केलेल्या कमाईमुळे हा चित्रपट महाराष्ट्रातील टॉप ५ दमदार ओपनिंग करणाऱ्या यादीत सामील झाला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने ३.५ कोटींचा गल्ला जमवला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. काल म्हणजेच १ जानेवारी रोजी या चित्रपटाने ४.५ कोटींची कमाई करत आतापर्यंत एकूण कमाईचा १० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हेही वाचा : “घरात राजकारणाची पार्श्वभूमी असूनही मी मनोरंजन सृष्टीत आलो तेव्हा आई-वडिलांनी…” रितेश देशमुखने केला खुलासा

या चित्रपटाच्या टिझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

Story img Loader