रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. दोन दिवसात या चित्रपटाने मोठाच गल्ला जमवलेला आहे.

अनेक दिवस रितेश आणि जिनिलीया त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलीया प्रेक्षगकांचं मन जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटाने दोन दिवसात किती रक्कम कमावले याचा आकडा आता समोर आला आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी

आणखी वाचा : “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी ३.५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी केलेल्या कमाईमुळे हा चित्रपट महाराष्ट्रातील दमदार ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये सामील झाला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने ४.४ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत एकूण मिळून या चित्रपटाने ७.९ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं

आधीपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार असा सगळ्यांना विश्वास होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. आता हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार का, हे चित्र येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल .

Story img Loader