रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. दोन दिवसात या चित्रपटाने मोठाच गल्ला जमवलेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनेक दिवस रितेश आणि जिनिलीया त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलीया प्रेक्षगकांचं मन जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटाने दोन दिवसात किती रक्कम कमावले याचा आकडा आता समोर आला आहे.
आणखी वाचा : “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट
‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी ३.५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी केलेल्या कमाईमुळे हा चित्रपट महाराष्ट्रातील दमदार ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये सामील झाला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने ४.४ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत एकूण मिळून या चित्रपटाने ७.९ कोटींची कमाई केली आहे.
हेही वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं
आधीपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार असा सगळ्यांना विश्वास होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. आता हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार का, हे चित्र येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल .