मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रितेश लवकरच ‘वेड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जेनिलियाबरोबरचे अनेक व्हिडीओ तो शेअर करत असतो. आता त्याने ‘वेड’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. रितेश देशमुख या व्हिडीओमध्ये ढोलवादन करताना दिसत आहे. नुकतंच रितेश व ‘वेड’ चित्रपटाच्या टीमने पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्रमोशनकरिता हजेरी लावली होती.

हेही वाचा>>“आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

हेही वाचा>> सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या लग्नाबाबत मित्राचा खुलासा, म्हणाला “त्यांच्या लग्नाची पत्रिका…”

रितेश देशमुखने या व्हिडीओला “हा वेडनेस होता. पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांसह ढोल वादनाचा अनुभव फारच छान होता”, असं कॅप्शन दिलं आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्याबरोबरचा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंनंतर मालिका विश्वातील अभिनेत्याची लगीनघाई, गुपचूप उरकला साखरपुडा

‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. येत्या ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रितेशसह बॉलिवूड अभिनेत्री जेनिलिया देशमुख व जिया शंकर मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritesh deshmukh played dhol with students during ved movie pramotion video viral kak