रितिका श्रोत्री मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकांमध्ये काम केल्यानंतर ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातून रितिकाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती, रितिकानेही या सोहळ्याला हजेरी लावली होती. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘झी टॉकीज’ वाहिनीवर हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पुरस्कार सोहळ्यासाठी रितिकाने सोनेरी रंगाची साडी आणि सिक्वेन्स असलेल्या लाल रंगाच्या स्लीवलेस ब्लाऊजची निवड केली होती. या ग्लॅमरस लूकमध्ये रितिका अतिशय सुंदर दिसत होती. यानिमित्ताने रितिकाने चाहत्यांसाठी एक लहानशी प्रश्नमंजूषा तयार केली.

हेही वाचा… बॉलीवूड कलाकारांनंतर रोहित शर्मानेही केलं ’12th फेल’चं कौतुक; विक्रांत मेस्सी प्रतिक्रिया देत म्हणाला…

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सोहळ्यादरम्यान रितिकाने तिच्याविषयीच्या ३ गोष्टी सांगितल्या आणि त्या तीन गोष्टींपैकी कोणती एक गोष्ट खोटी आहे हे ओळखण्यास सांगितले. ‘झी टॉकीज’ च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर रितिकाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “मी तुम्हाला माझ्याविषयीच्या ३ गोष्टी सांगणार आहे ज्यापैकी एक गोष्ट खोटी आहे जी तुम्हाला ओळखायची आहे. नंबर एक – माझ्या पहिल्या फिल्मचं नाव होत ‘स्लॅमबूक’. नंबर दोन – मी सिंगल आहे आणि नंबर तीन – मला नॉनव्हेज खूप आवडतं. यापैकी कोणती गोष्ट खोटी आहे हे खाली कंमेंट्स मध्ये सांगा,” असं रितिका म्हणताना दिसतेय.

अभिनेत्रीच्या या प्रश्नांवर तर्कवितर्क लावून नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला “तू सिंगल आहेस हे साफ खोटं आहे” तर दुसऱ्याने लिहिले, “यातलं काय खोटं आहे हे आम्हाला माहित नाही, परंतु सर्व मुलांची इच्छा असेल की विधान क्रमांक दोन नक्की खोटं नसावं.”

दरम्यान रितिका श्रोत्री ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. रितिका श्रोत्रीने आगामी चित्रपट ‘जमीर’ याचे स्क्रीनप्ले व संवाद लेखन केले आहे. या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritika shrotri asked the audience about her relationship during maharashtracha favourite kon award ceremony dvr