नवीन वर्षात मराठी प्रेक्षकांसाठी अनेक मराठी कलाकृती येणार आहेत. काही चित्रपटांची घोषणा झाली आहे. तर काहींच्या रिलीज डेट ठरल्या आहेत. जानेवारी महिन्यातही बरेच मराठी चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहेत. अशातच सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत.
चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत. राजेश व रोहन मापुस्कर पहिल्यांदाच एकत्र एक कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी आणणार आहेत. त्यांच्या चित्रपटाचं नाव देखील ठरलं आहे. हा चित्रपट केव्हा रिलीज होईल व चित्रपटाची कथा काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. रोहन मापुस्कर ‘एप्रिल मे ९९’ मधून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.
हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘येक नंबर’ सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखलं जातं, तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ व ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स ‘एप्रिल मे ९९’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?
तर आता प्रश्न असा आहे की, चित्रपटाची कथा काय असेल? कलाकार कोण असतील? यांसारख्या अनेक गोष्टी अद्याप गोपनीय असल्या तरी या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर धमाका करणार हे नक्की!
© IE Online Media Services (P) Ltd