केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने आत्ताप्रर्यंत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांनी जया काकडे ही भूमिका साकारली आहे. रोहिणी हट्टंगडी यांच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. पण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर रोहिणी हट्टंगडी यांना दुसऱ्या क्षेत्रात करिअर बनवायचं होतं. खुद्द रोहिणी हट्टंगडी यांनी एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “इन्स्टाग्रामवर बायका मला…” ‘बाईपण भारी देवा’नंतर आलेल्या अनुभवाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा

रोहिणी हट्टंगडी यांनी मराठीबरोबर. हिंदी चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. रोहिणी यांनी लहानपणीच नृत्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेत्या शिक्षकांनी त्यांचा डान्स पाहून त्यांना नाटकात काम करणार का असं विचारलं होतं. त्यानंतर मंतरलेलं पाणी या नाटकात त्यांनी पहिल्यांदा काम केलं. त्यानंतर त्यांचा नाटकाचा प्रवास सुरु झाला.

हेही वाचा- “बार्बी भारतीय असती तर?”, बायको मिताली मयेकरच्या व्हिडीओवर सिद्धार्थ चांदेकरने केली खास कमेंट; म्हणाला, “लगीन करायचंय…”

महाविद्यालयात असताना त्यांची डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण त्यांना हवं ते महाविद्यालय न मिळाल्यामुळे त्यांनी तो विचार बाजूला ठेवला आणि ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेतला. रोहिणी यांचे बाबासुद्धा अभिनय क्षेत्रात होते. आईच्या प्रोत्साहानामुळे त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. १९७६ मध्ये तेलगु चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी पहिल्यांदा काम केलं. आणि त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली. ‘अग्निपथ’ चित्रपटातील रोहीणी हट्टंगडी यांनी साकारलेली अभिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका खूपच गाजली. रोहिणी यांनी मराठीबरोबर हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळ ठसा उमटवला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohini hattangadi wanted to become a doctor before entering the acting field dpj