मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने रविवारी (९ ऑक्टोबर) एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ शेअर करत टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. त्यानंतर तिच्या अकाउंटची ब्लू टिक हटवली गेली. यावर तिने कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, असं म्हणत पोस्ट केली होती. हीच पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेअर करत कुणाकुणाचा आवाज दाबणार? असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोलबद्दल प्रश्न विचारणाऱ्या तेजस्विनी पंडितच्या सोशल अकाउंटवर कारवाई; संताप व्यक्त करत म्हणाली, “या बंदीने माझा…”

तेजस्विनीने शेअर केलेला देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ

“शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही चारचाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रातील टोलवर आपण फक्त कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो,” असं त्या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणाली, “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! तुमचं हे विधान कसं असू शकतं? तुम्हालाही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!”

अकाउंटची ब्लू टिक हटवली

तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर तेजस्विनीने संताप व्यक्त केला होता. “माझ्या एक्स (ट्विटर) अकाउंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण काय तर मी आम्हा जनतेची इतकी वर्षे फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून.
सत्तेत कोणी का बसेना, आम्ही जनता आहोत!
जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल,
तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे,” अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने केली होती.

रोहित पवार काय म्हणाले?

तिची ही पोस्ट शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तिला पाठिंबा दिला आहे. “विरोधात व्हिडीओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटर ची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार?

इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?” असं रोहित पवारांनी तेजस्विनीची पोस्ट शेअर करत लिहिलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar on tejaswini pandit x blue tick removal after she shared devendra fadnavis video about toll hrc
Show comments