रोहित शेट्टी बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हिंदीमध्ये दमदार कमाई करणारे चित्रपट बनवल्यानंतर आता रोहित शेट्टीची निर्मिती असलेला महिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ हा चित्रपट लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्या चित्रपटांच्या कमाईत ६० टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे, असं म्हणणारा रोहित मराठी कलाकारांना आवर्जून त्याच्या चित्रपटांमध्ये घेतो. आता तर त्याने मराठी चित्रपटही बनवला आहे. त्याच्या या चित्रपटात ‘नागीन’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश व करण परब मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सगळे कलाकार व्यग्र आहेत.
मराठीत पदार्पणासाठी ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ हाच चित्रपट का निवडला, असा प्रश्न एका मुलाखतीत रोहितला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत रोहित म्हणाला, “या सिनेमाबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ‘रोहित शेट्टी’चा सिनेमा नाही. तुम्ही पाहाल तर कळेल की खूप साधा असा हा विषय आहे. प्रत्येकाला त्याच्या शाळा, कॉलेजच्या आठवणींशी जोडणारा आहे. हा चित्रपट पाहिल्यावर एखाद्याला त्याचं जुनं प्रेम आठवेल तर कोणाला ब्रेकअपची आठवण होईल. त्यामुळे सिनेमात एखादा तरी असा सीन असेल की तुम्हाला वाटेल हे माझ्यासोबतही घडलं आहे. म्हणूनच याच चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं.”
रोहित शेट्टीचं मराठीशी खास कनेक्शन आहे आणि त्याला आधीपासूनच मराठी चित्रपटही आवडतात. तुझा आवडता कोणता मराठी चित्रपट आहे, जो तुला प्रेरित करतो, असं विचारल्यावर रोहितने लहानपणीची आठवण सांगितली. “लहानपणी दूरदर्शनवर शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी चित्रपट लागायचे. तेव्हा मी अनेक मराठी चित्रपट पाहिले. त्यापैकी ‘पिंजरा’ हा माझा सर्वात आवडता चित्रपट होता. लहानपणी कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन दूरदर्शनवर चित्रपट बघायचे. ती एक प्रथाच झाली होती. त्यामुळे शनिवारी दुरदर्शनवर लागणारे अनेक मराठी चित्रपट मी पाहिले होते,” असं रोहित शेट्टीने सांगितलं.