राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. नुकतंच त्याच्या पहिल्या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. सोहम चाकणकर याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आणि पोस्टरही समोर आलं आहे.

रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकरने राजकारणात नशीब न आजमावता थेट अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्वजण चकीत झाले आहेत. विशेष म्हणजे सोहमच्या पहिल्या चित्रपटाचे नावही समोर आले आहे. विरजण या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. सोहमचा हा पहिला चित्रपट असून यात तो एका रोमँटिक अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे.
आणखी वाचा : गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगानं घेतली दखल; रुपाली चाकणकर ट्वीट करत म्हणाल्या…

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

प्रेम करणं तितकं सोपं नसतं. प्रेमाच्याही दोन बाजू असतात. ‘प्रेम’ ही एक अशी भावना आहे जी कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येते. यामध्ये काहींचं नातं पूर्णत्वास जातं तर काहींना दुःख, अपयश पचवावं लागतं. अशाच प्रेमाची कथा सांगणारा हा चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टरही फार बोलक्या स्वरुपातील आहे. यातील पहिल्या पोस्टरमध्ये सोहम आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे हे शेजारी बसलेले पाहायला मिळत आहे. त्यावेळी शिल्पा ही सोहमचा कान पकडला असून तो तोंडावर बोट धरुन शांत बसल्याचे दिसत आहे. तसेच या पोस्टरवर एक मुलगा मुलीवर जबरदस्ती करत असल्याचेही पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा : ‘तुझं नेमकं वय किती?’ शिव ठाकरे म्हणाला, “माझं वय…” 

तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ते दोघेही डेटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी ते सेल्फी काढताना दिसत आहे. या पोस्टरवरही एक मुलगा मुलीवर जबरदस्ती करत असल्याचेही ब्लॅक अँड व्हाईट चित्र पाहायला मिळत आहेत.

दरम्यान हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या चित्रपटात सोहम चाकणकरसोबत अभिनेत्री शिल्पा ठाकरे दिसणार आहे. सोहम आणि शिल्पा पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

Story img Loader