अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या निखळ हास्याचे, सौदर्याचे लाखो चाहते आहेत. मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोशल मीडियावर तर प्राजक्ताला लाखो लोक फॉलो करतात. प्राजक्ता फक्त अभिनयक्षेत्रापुरतीच मर्यादित नाही. ती आता एक व्यावसायिकाही झाली आहे. अशा सर्वगुण संपन्न अभिनेत्रीच्या प्रेमात काही कलाकारही आहेत.
प्राजक्ताने फक्त तिच्या सौंदर्यामुळेच नव्हे तर काम, स्वभावामुळेही सगळ्यांना आपलसं केलं आहे. मध्यंतरी ‘सकाळ’च्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये प्राजक्ता माझी लेडी क्रश होती असं अभिनेत्री ऋतुजा बागवेने म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा हाच विषय चर्चेत आला आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात प्राजक्ता व ऋतुजाने हजेरी लावली होती.
यावेळी ऋतुजास प्राजक्तालाही काही अफवांबाबत विचारण्यात आलं. ऋतुजाला या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालिकेने विचारलं की, “आम्ही असं ऐकलं आहे की, प्राजक्ता माळी ही तुझी लेडी क्रश आहे. आणि तू तिच्याबरोबर लेस्बियन पार्टनर व्हायला तयार झाली आहेस.” हे ऐकल्यानंतर ऋतुजा व प्राजक्ताचे चेहऱ्यावरील हावभाव अगदी बघण्यासारखे होते.
आणखी वाचा – चाहत्यांनी ‘तो’ प्रकार निदर्शनास आणून देताच प्राजक्ता माळीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “हे माझं…”
ऋतुजा या प्रश्नानंतर प्राजक्ताला म्हणाली, “मी यावर्षी लग्न करणार आहे”. पण या प्रश्नानंतर दोघींनीही एकमेकींकडे बघितलं. तसेच जोरात हसू लागल्या. ऋतुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. तसेच या कार्यक्रमात खासगी आयुष्याबाबत काही प्रश्नही ऋतुजा व प्राजक्ताला विचारण्यात आले आहेत.