गेल्या काही वर्षांपासून मालिका, चित्रपट आणि ओटीटीवर विविध प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी सिनेसृष्टीत विविध गूढ मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता अशाच एका गूढ कथेवर आधारित ‘निळावंती’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच याचे एक पोस्टर प्रदर्शित झाले आहेत.

निळावंती या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक स्त्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय… अशी टॅगलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न अनेकांना पडला याहे. याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण? अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
आणखी वाचा : “फक्त हॉलिवूडचे चित्रपट पाहून…”, निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या

लवकरच निळावंती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. लवकरच त्यांचा चेहरा माध्यमांसमोर येईल. ज्या व्यक्तींना निळावंती ग्रंथाबद्दल माहित असेल त्या व्यक्तींसाठी त्याची पूर्ण माहिती चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक लोकांना हा शब्द देखील नवीन असेल, त्यांना देखील याबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होईल, अशी ही गूढ कथा आहे, अशी प्रतिक्रिया लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे यांनी दिली.

nilavanti movie first poster out
‘निळावंती’ चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

‘निळावंती’ हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल फार क्वचित लोकांना माहित आहे. हा ग्रंथ कोणी सहसा वाचत नाही. कारण अनेक अफवा या ग्रंथाबद्दल पूर्वी पसरल्या होत्या. या सर्व गोष्टी सत्य घटनेवर आधारित आहेत की नाही त्याचीच संपूर्ण कथा आता आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून सचिन दाभाडे दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘निळावंती’ राक्षसी की दैवी रूप आहे, ही अफवा आहे की सत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे.

आणखी वाचा : “तू पँट खराब केलीस, आता आई तुला मारणार…”, चाहतीच्या कमेंटवर अक्षय केळकरने दिले उत्तर, म्हणाला “माझी…”

दरम्यान निळावंती या चित्रपटात नक्की कोणकोणते कलाकार झळकणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली आहे. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दलही लोकांना उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Story img Loader