Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या १९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. २० सप्टेंबरला ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट प्रदर्शित झाला; ज्याला अजूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाची नुकतीच सक्सेस पार्टी जोरदार पार पडली. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित, निर्मिती ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात जुन्या कलाकारांसह बरेच नवे चेहरे पाहायला मिळाले. या चित्रपटात पुन्हा एका वेगळ्या नवसाची गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलने दिवाळीनिमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, राखी सावंतच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई केली. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.८६ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.४३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३.५५ कोटींचा गल्ला ‘नवरा माझा नवसाचा २’ने जमवला. त्यानंतर या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदोड पाहायला मिळाली. याच यशाच नुकतंच सेलिब्रेशन करण्यात आलं. ‘नवरा माझा नवसाचा २’च्या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटातील कलाकार मंडळींसह इतर कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ चित्रपटातील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तसंच सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लाडकी लेक, अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने सक्सेस पार्टीमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ‘सत्या’ चित्रपटातील ‘सपने में मिलती हैं’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत श्रियाने लिहिलं आहे, “माझे रॉकस्टार्स पालक. आज दिवाळीनिमित्ताने आम्ही ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या यशाची पार्टी टीमबरोबर केली.”

हेही वाचा – “१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/11/Dance-Video-4.mp4

हेही वाचा – Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यात ‘हा’ सदस्य झाला एलिमिनेट, घराबाहेर जाण्यापासून शिल्पा शिरोडकरसह सुरक्षित झाले ‘हे’ सहा सदस्य

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रदर्शित होण्यापूर्वी सातत्याने श्रिया पिळगांवकर चित्रपटात असणार का? असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण, याच उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अखेर मिळालंच. श्रियाने ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील ‘डम डम डम डम डमरू वाजे’ गाण्यात डान्स केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar and supriya pilgaonkar dance in navra maza navsacha 2 success party pps