Navra Maza Navsacha 2 : मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अशातच आता सचिन पिळगावकरांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

तब्बल १९ वर्षांनी निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पहिल्या चित्रपटात आपल्याला गणपती पुळेच्या सहलीची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घडलं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? यामध्ये कोणकोणते ट्विस्ट असतील याचा उलगडा थेट चित्रपटगृहात होणार आहे. परंतु, तत्पूर्वी या चित्रपटातील तगड्या स्टारकास्टची नावं समोर आली आहेत.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : ‘केसरी’च्या बातमीबद्दल शंकेस वाव
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
jayam ravi changed his name
दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…

हेही वाचा : “अनुपम सरांनी मेसेज करून माफी…”, सई ताम्हणकरने सांगितला फिल्मफेअरचा किस्सा; म्हणाली, “रणवीरने…”

चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक तसेच प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून चित्रपटाची स्टारकास्ट जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.

हेही वाचा : वडील रवींद्र महाजनींवरील बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, “सर्वकाही…”

हेही वाचा : “गणितात फक्त ३ गुण…”, मालिकाविश्व गाजवणारी जुई गडकरी अकरावीत झालेली नापास; सांगितला मजेशीर किस्सा

दरम्यान, सचिन पिळगावकरांनी दुसऱ्या भागाची घोषणा करताच या चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. नेटकऱ्यांनी त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह चित्रपटाच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Story img Loader