Navra Maza Navsacha 2 : २० सप्टेंबरला प्रदर्शित झालेला ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे सचिन पिळगांवकर निर्मित आणि दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. तसाच आता ‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देत आहेत.

हेही वाचा – महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगसाठी ‘या’ दोन अभिनेत्यांना केली होती विचारणा, रितेश देशमुख नव्हे तर…

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १४.३६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसंच शुक्रवार, शनिवार आणि रविवार ४.२१ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने १८.५७ कोटींची कमाई केली आहे. यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – “चांगल्या माणसाला कायमच…”, पंढरीनाथ कांबळेसाठी अंशुमन विचारेच्या पत्नीची खास पोस्ट; म्हणाली, “तू ट्रॉफी नाही…”

हेही वाचा – Video: “पॅडी दादा…”, सूरज चव्हाण पंढरीनाथ कांबळेच्या आठवणीत झाला भावुक; म्हणाला, “मन भरून आलं…”

माहितीनुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटाचं बजेट ८ कोटींच्या आसपास असून चित्रपटाने फक्त चार दिवसांत बजेट वसूल केलं आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने १.२० कोटींची कमाई केली होती. दरम्यान, या चित्रपटाची गोष्ट कोकण रेल्वे प्रवासात घडली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar ashok saraf starr navra maza navsacha 2 box office collection in 10 days pps