सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ जाधवचे ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचे डबिंग पूर्ण झाले. सिद्धार्थने डबिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटातील एका गाण्यासंदर्भात हिंट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही परीक्षकाच्या भूमिकेत सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे पाहायला मिळणार आहेत. त्यानिमित्ताने हे परीक्षक विविध एंटरटेनमेंट माध्यमाशी संवाद साधताना दिसत आहे. नुकतीच सचिन पिळगांवकर आणि आदर्श शिंदेने ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी सचिन यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील गाण्यासंदर्भात हिंट दिली.

हेही वाचा – अशोक सराफ न चुकता रोज पाहतात ‘ही’ लोकप्रिय मालिका; अभिनेत्रीने पोस्ट करून केला खुलासा

सचिन पिळगांवकर म्हणाले, ” ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. डबिंग पूर्ण झालं आहे. पोस्ट सध्या चालू आहे. त्याची धावपळ सुरू आहे. चित्रपटाचं चित्रीकरण करताना कलाकार म्हणून स्वप्नील जोशीने; जो मला माझ्या मुलासारखा आहे. त्याने या चित्रपटात जे काही काम केलं आहे, तर मला नाही वाटतं त्याने याआधी इतकं सुंदर काम कुठल्या दुसऱ्या चित्रपटात केलं असावं. चित्रपटात एक गाणं आहे; त्याची घोषणा मी वेगळ्या पद्धतीने गाण्यासकट करणारच आहे. पण त्या गाण्याबद्दल मात्र नक्कीच बोलायचं आहे. ते जे गाणं आहे ते चित्रपटाच्या शेवटी येत आणि ते गाणं मी व आदर्श शिंदेनं गायलं आहे.” सचिन पिळगांवकरांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील या गाण्यासंदर्भात जाहीर केल्यानंतर आदर्श शिंदे म्हणाला, “मला वाटलं नव्हतं आज हे समोर येईल.”

हेही वाचा – Video: मेस्सीची जर्सी, दोन वेण्या अन् सोनाली कुलकर्णीचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “विकी कौशल तू…”

हेही वाचा – मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”

‘नवरा माझा नवसाचा २’ कधी प्रदर्शित होणार?

काही महिन्यांपूर्वी सचिन पिळगांवकर यांनी माध्यमांशी बोलताना ‘नवरा माझा नवसाचा २’ कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केलं होतं. ते म्हणाले होते, “मी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तुमच्या शुभेच्छा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत यावर्षी चित्रपट प्रदर्शित होणार. पण गणपतीच्या आशीर्वादने. जर त्याचा आशीर्वाद असला तर याच वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar hint song of navra maza navsacha 2 movie pps