ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठी सिनेसृष्टीला असे बरेच चित्रपट दिले आहेत, जे अजरामर राहतील. त्यापैकी एक म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’. २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अशातच आता ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची आनंदी बातमी समोर आली आहे.

हो. हे खरं आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. सचिन पिळगांवकर निर्मित, दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला उद्यापासून (५ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. याचा खुलासा ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

हेही वाचा – निर्मिती क्षेत्रात डंका वाजवणारी ‘ही’ लोकप्रिय मराठी अभिनेत्री लवकरच झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये, पोस्ट करत म्हणाली…

जयवंत वाडकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या क्लॅपचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिल आहे, “नवरा माझा नवसाचा २….चित्रपटाचे चित्रीकरण उद्यापासून सुरू होतं आहे. तुमचे आशीर्वाद पाठिशी राहू द्या.”

जयवंत वाडकर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “काय म्हणता, खूप आनंदाची बातमी काका, खूप उत्साही आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “या चित्रपटात अशोक मामा पाहिजे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “२००४ ते २०२४, २० वर्षांपासून याची वाट पाहात आहोत.”

हेही वाचा – हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या कलेक्शनध्ये मोठी वाढ, शनिवारी केली जबरदस्त कमाई

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर असे अनेक तगडे कलाकार होते. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कोण-कोण कलाकार असणार? चित्रपटाची कथा काय असणार? कधी प्रदर्शित होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आता येत्या काळात मिळणार आहेत.

Story img Loader