Sachin Pilgaonkar : वैविध्यपूर्ण हिंदी व मराठी चित्रपट, दिग्दर्शन, गायन अशा सगळ्या माध्यमांमध्ये पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार आहेत. महिला दिनानिमित्त मार्च महिन्यात ‘स्थळ’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ‘स्थळ’ चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी ‘स्थळ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

manmohan mahimkar in financial trouble
ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला काम मिळेना; खोली विकण्यासाठी कुटुंबीयांकडून दबाव, आर्थिक संकट अन्…; खंत व्यक्त करत म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
siddharth chandekar special connection with 24 January
सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात ‘२४ जानेवारी’चं आहे खास महत्त्व! काय आहे कनेक्शन? ‘तो’ Video शेअर करत म्हणाला…
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
Marathi actress alka kubal said about behind story of these photos
अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया

हेही वाचा : Video : पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया

दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं. ‘स्थळ’ हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि तिथे त्याला सर्वश्रेष्ठ आशिया पॅसिफिक फिल्मसाठी NETPAC अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर तब्बल २९ महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे आणि १६ पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

हेही वाचा : Video : ‘नवरी मिळे हिटलरला’मधील ‘या’ जोडप्याने ‘हैला हैला’ गाण्यावर धरला ठेका; नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “हृतिक आणि प्रीती…”

“सर्वप्रथम श्रियाने मामी फेस्टिवल मध्ये हा चित्रपट पाहिला होता. खास श्रियाच्या आग्रहास्तव अमेरिकेत ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये मी आणि सुप्रियाने ‘स्थळ’ हा चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हा दोघांनाही प्रचंड आवडला होता. महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेलं पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे निर्माता, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना आम्ही सांगितलं होतं. ‘स्थळ’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यासाठी विचारलं आणि मी लगेच होकर दिला. चांगली संहिता ही रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहोचली पाहिजे यासाठी मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरवलं.” असे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.

Story img Loader