ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची मराठी रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांचे रील्स तुफान व्हायरल होतं आहेत. अशातच ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी रत्नागिरीचा सुरज’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. एका व्हिडीओमध्ये गणपतीपुळे समुद्र किनारी शूटिंग होताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये रत्नागिरी स्थानकावरील शूटिंग पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे दिसत आहेत. सचिन व सुप्रिया यांच्या हातात बॅग वगैरे पाहायला मिळत असून स्वप्नीलच्या हातामध्ये गोंडस बाप्पाची मूर्ती आहे. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

हेही वाचा – “…तर मला अटक करा”, तीन दिवसांपूर्वी पुन्हा बाबा झालेले सिद्धू मुसेवालाचे वडील असं का म्हणाले? जाणून घ्या…

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली आहे. ५ फेब्रुवारीपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. सध्या कोकणात चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.

हेही वाचा – Video: नव्या नवेलीच्या कथित बॉयफ्रेंडने माधुरी दीक्षितची केली मदत, नेटकरी म्हणाले, “शाहरुख खानसारखे…”

‘नवरा माझा नवसाचा २’ कधी प्रदर्शित होणार?

काही दिवसांपूर्वी सचिन पिळगांवकर यांनी माध्यमांशी बोलताना ‘नवरा माझा नवसाचा २’ कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केलं होतं. ते म्हणाले होते, “मी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तुमच्या शुभेच्छा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत यावर्षी चित्रपट प्रदर्शित होणार. पण गणपतीच्या आशीर्वादने. जर त्याचा आशीर्वाद असला तर याच वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar supriya pilgaonkar swapnil joshi star navra maza navsacha part 2 shooting start on ratnagiri video viral pps