Kishori Godbole Daughter Sai Godbole : मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून अभिनेत्री किशोरी गोडबोले घराघरांत लोकप्रिय झाली. काही वर्षांपासून किशोरी छोट्या पडद्यापासून काहिशी दूर आहे. पण, आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत तिची लेक सई गोडबोले मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे.

‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेमुळे अभिनेत्री किशोरी गोडबोले घराघरांत लोकप्रिय झाली. ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. अभिनेत्री सध्या कलाविश्वापासून लांब असली तरीही अलीकडे सोशल मीडियावर तिच्या लेकीची जोरदार चर्चा चालू आहे.

sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

सई गोडबोले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनय आणि गाण्याबरोबरच ती उत्तम नृत्यदेखील करते. सईने मराठीतील अनेक जुनी गाणी नव्या रुपात गायली आहेत.

हेही वाचा : ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

सई गोडबोले ( Sai Godbole ) आघाडीची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून देखील ओळखली जाते. आजची तरुणाई सईकडे मल्टीटॅलेंटेड इन्फ्लुएन्सर म्हणून पाहते. नुकतीच तिच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली आहे. सईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सईची जगप्रसिद्ध ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा तिच्या कुटुंबीयांसाठी देखील अभिमानाचा क्षण आहे. यामुळेच तिची आई किशोरीने पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या लेकीचं कौतुक केलं आहे.

किशोरी लिहिते, “सई माझी मुलगी Apple कंपनीची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे, ती गेल्या आठवड्यात Apple ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी लॉस एंजेलिस येथे गेली होती. माझ्या या मल्टिटॅलेंटेड लेकीने हा मोठा सन्मान मिळवला आहे. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर, तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट साध्य करू शकता हे पुन्हा एकदा सईने सिद्ध करू दाखवलं आहे. अशीच पुढे जा, तुला आयुष्यात भरभरून यश मिळो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशी आहेस तशीच राहा. मला तुझा खूप खूप अभिमान आहे मोहा”

हेही वाचा : Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक

दरम्यान, किशोरी गोडबोलेच्या पोस्टवर पूजा सावंत, अश्विनी कासार, सुकन्या मोने, सोनाली खरे या अभिनेत्रींनी कमेंट्स करत सईचं ( Sai Godbole ) कौतुक केलं आहे. तर, आईची पोस्ट पाहून सई लिहिते, “लव्ह यू मॉमी…हे खूपच गोड आहे. हे सगळं तुझ्या प्रेमामुळे शक्य झालं.” संपूर्ण मनोरंजन विश्वातून सईवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader