मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. चित्रपटसृष्टीतील वैयक्तिक स्पर्धा बाजूला ठेवत या कलाकारांचे एकमेकांशी खूप घट्ट नाते असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. याचेच उत्तम उदाहरण पाहायचे झाले तर, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे आणि सई ताम्हणकर या तिन्ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या चांगल्या आणि जिवलग मैत्रिणी आहेत. सोनालीने नुकताच त्यांच्या मैत्रिची झलक दाखवणारा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “तीन वर्ष ऑडिशन्स देऊन…”, बॉलीवूड अभिनेत्याला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “बायकोचे दागिने, राहते घर…”

सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर आणि प्रार्थना बेहरे या दोन्ही अभिनेत्री “अजीब दास्तां है ये, कहा शुरु कहा खतम…” हे लोकप्रिय गाणे गाताना दिसत आहेत. दोघींचे हावभाव पाहून हे गाणे त्या सोनालीसाठी गात असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सोनाली कुलकर्णीने या दोघींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : “२० दिवस एकच पोशाख, पाण्यासाठी भीक अन् व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”, ‘तारक मेहता’ फेम जेनिफर मिस्त्रीचे निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप

व्हिडीओला कॅप्शन देत सोनाली लिहिते, “याला म्हणतात खूप जवळची मैत्री…या अशा वागणार आणि माझा अपमान करणार. देव करो अन् सर्वांना यांच्यासारखे मित्र मिळो!” सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स येत आहेत. अभिनेत्रीने जागतिक मैत्री दिनानिमित्त या व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : “२३ दिवस, २ देश आणि ११ प्रयोग”, प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली, “महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचं कुटुंब…”

एका युजरने लिहिले आहे, “भारी बॉण्डिंग सई ताई, प्रार्थना ताई आणि आणि सोनाली ताई” तर, दुसऱ्या एका युजरने “३ स्टार्स इन वन फ्रेम” अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. इतर काही युजर्सनी असेच नवनवीन व्हिडीओ शेअर करत जा असेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे. दरम्यान, सोनाली व प्रार्थनाने यापूर्वी ‘मितवा’ या चित्रपटात आणि सई व सोनालीने यापूर्वी ‘क्लासमेट’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. लवकरच सोनाली कुलकर्णी ‘डेट भेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.