एक नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी यात मराठीतील आघाडीचे कलाकार यात झळकणार आहेत. तब्बल ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश चौधरी, सई ताम्हणकर व स्वप्नील जोशी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. या चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल खूप उत्सुकरता पाहायला मिळत आहे.

सई ताम्हणकर, अंकुश चौधरी व स्वप्नील जोशी आणि संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल आणि धडधड पण नक्कीच झाली असेल. अशीच काहीशी उत्सुकता आता वाढणार आहे. कारण ही प्रेक्षकांची ऑल टाइम फेव्हरेट टीम आता पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

Shashank Ketkar
“इतकं करूनही शेवटी…”, अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मागच्या १४ वर्षांत…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ankush Chaudhari
अंकुश चौधरीने केली मोठी घोषणा! १३ वर्षानंतर ‘नो एंट्री पुढे धोका आहे’चा सीक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला
star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
Maharashtrachi Hasya Jatra nikki tamboli
“मी कोकणात शिमग्याला जातेय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये भन्नाट स्किट सादर करणार निक्की तांबोळी, समोर आला प्रोमो

बॉलीवूड अभिनेत्रीने प्रचार करूनही हरले तिचे बाबा, पराभवानंतर पोस्ट करत म्हणाली, “ज्यांनी माझ्या वडिलांवर…”

चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार आहे. ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत.

marathi movie
चित्रपटाच्या टीमचा फोटो (सौजन्य – पीआर)

स्मिता पाटील यांच्या कांजीवरम साड्यांपासून बनवलेला सूट घालून लेक प्रतीक पोहोचला Cannes मध्ये, पाहा खास Photos

या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणाले,” संजय जाधव यांचासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत ‘येरे येरे पैसा’, ‘येरे येरे पैसा ३’, कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!”

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही, तसेच चित्रपटाची कथा काय असेल याबाबतही निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. चित्रपटावर काम सुरू झालं आहे आणि यात सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी व अंकुश चौधरी हे ‘दुनियादारी’ नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसतील हे स्पष्ट झालं आहे. सुपरहिट ‘दुनियादारी’ नंतर आता या तिघांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Story img Loader