Sai Tamhankar : ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या मराठी चित्रपटांपासून ते बॉलीवूडच्या ‘मिमी’, ‘हंटर’ चित्रपटापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं. सईने गेल्यावर्षी वैयक्तिक आयुष्यात मुंबईत आलिशान घर घेतलं. अभिनेत्रीचं घर मालाड परिसरात ४५ मजल्यावर आहे. दिवाळीनिमित्त अभिनेत्रीने या घरात खास दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेल्यावर्षी सुद्धा तिने मनोरंजन विश्वातील अनेक मित्र-मैत्रिणींना आपल्या घरी दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. यावर्षी दिवाळी पहाटला सईची आई मृणालिनी ताम्हणकर यांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॅशन असो किंवा अभिनय सई ( Sai Tamhankar ) कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. सध्या ती एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे. नुकतीच सईच्या नव्या घरात दिवाळीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी सईने तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना तसेच घरच्या मंडळींना निमंत्रित केलं होतं. कायम शूटिंगमध्ये व्यग्र असणारी सई दिवाळीत आपल्या कुटुंबीयांबरोबर खास वेळ घालवताना दिसली. दिवाळीत अनेक कलाकार दिवाळी पार्टी ठेवतात पण, सईने तिच्या ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करून सर्वांना सुमधूर गाणी ऐकण्याची ट्रीट दिली असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांकडे गृहखातं, तर तुकोबा अर्थमंत्री…; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कवितेतून पांडुरंगाला साद, व्हिडीओ व्हायरल

या दिवाळी पहाटला सईची ( Sai Tamhankar ) आई मृणालिनी ताम्हणकर या देखील उपस्थित होत्या. याशिवाय सईच्या ‘मानवत मर्डर्स’ सीरिजचे दिग्दर्शक आशिष बेंडे, अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांच्यासह अभिनेत्रीच्या जवळचे इतरही काही कलाकार तिच्या नव्या घरात उपस्थित होते.

दिवाळीनिमित्त सईच्या ‘द इलेव्हन्थ प्लेस’ या मुंबईतील घरी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्यावर्षीपासून सई या घरी वास्तव्यास आहे. गेल्यावर्षीच्या दिवाळीमध्येही तिने खास दिवाळी पहाटसाठी सांगितिक मेजवानी आयोजित केली होती. यंदाही अभिनेत्रीने ही परंपरा सुरू ठेवली आहे. सईने सोशल मीडियावर यंदाच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत.

सईच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात यावेळी लोकप्रिय सतारवादक मेहताब अली नियाझी उपस्थित होते. तर त्यांना तबला वादनासाठी खुर्रम अली नियाझी यांची साथ मिळाली. अभिनेत्रीने या कार्यक्रमाची झलक इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे.

हेही वाचा : भावामुळे ओळख, कॅलिफोर्नियात लग्न अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरी दीक्षितने सांगितलं सुखी संसाराचं गुपित, म्हणाली…

सईच्या ( Sai Tamhankar ) लूकची देखील सर्वत्र चर्चा होत आहे. दिवाळीनिमित्त तिने फ्लॉरल अनारकली ड्रेसला पसंती दिली असून त्यावर उठावदार नेकलेस परिधान केला आहे. दरम्यान, दिवाळी पार्ट्यांच्या ट्रेंडमध्ये अशाप्रकारच्या पारंपरिक दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे सोशल मीडियावर सईचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar arrange diwali pahat for loved ones her mother visits daughter new house sva 00