मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर निर्माता अनिश जोगला डेट करत आहे. सई व अनिश दोघेही सध्या स्पेनमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहेत. खरं तर दोघांनी स्पेनधील वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शेअर केले होते, त्यामुळे ते एकत्र फिरायला गेल्याची चर्चा होती. पण आता अनिशने दोघांचाही एक फोटो शेअर करत याची पुष्टी केली आहे.

सई ताम्हणकरने स्पेनमधून शेअर केले खाद्यपदार्थांचे फोटो; तळलेल्या मिरच्या पाहून नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रात…”

अनिश व सईचा हा रोमँटिक फोटो चांगलाच चर्चेत आहे. अनिशने या फोटोला कॅप्शन दिलेलं नाही. फोटोमध्ये सईने अनिशला मिठी मारली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या स्पेन व्हेकेशनची चांगलीच चर्चा होती. आता चाहत्यांना त्यांचा एकत्र फोटो पाहायला मिळाला आहे.

anish jog sai tamhankar
अनिश जोगची इन्स्टाग्राम स्टोरी

सई ताम्हणकर आणि अनिश जोग एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे. जवळपास वर्षभरापासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

Story img Loader