सई ताम्हणकर सध्या स्पेनमध्ये व्हॅकेशन एण्जॉय करताना दिसत आहे. तिचे स्पेनमधील बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय २५ जूनला सईचा ३७वा वाढदिवस होता. स्पेनमध्येच तिने वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला. यादरम्यानचे फोटो तिने आता इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. सईने शेअर केलेल्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.
सई तिला मिळालेल्या वेळेमध्ये स्वतःचा वेळ एण्जॉय करताना दिसत आहे. सईच्या वाढदिवसानिमित्त तिला अनेक कलाकार मंडळींनी वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. तसेच स्पेनमध्ये ती बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे. अनिशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्पेनचे काही फोटो शेअर केले होते.
आणखी वाचा – Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…
सईने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉल लूक पाहायला मिळत आहे. तसेच स्पेनमधील विविध पदार्थांचा फोटोही तिने शेअर केला आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच तू स्पनेला कोणाबरोबर गेली? असा प्रश्नही सईला विचारण्यात येत आहे.
स्पेनमधील फोटो शेअर केल्यानंतर सईच्या नो मेकअप लूकचीही चर्चा रंगताना दिसत आहे. शिवाय सई व अनिशचं नातं त्यांच्या स्पेन ट्रीपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सई व अनिश एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे.