‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाला पहिल्या दोन आठवड्यांमध्ये १०० कोटींचा गल्ला जमावण्यात यश मिळाले आहे. या चित्रपटामधील प्रत्येक व्यक्तिरेखेचे कौतुक करण्यात येत आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रॉकी और रानी’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्षिती जोगने या चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका निभावली आहे. या भूमिकेसाठी खुद्द करण जोहरने तिचे कौतुक केले होते. आता अभिनेत्री सई ताम्हणकरने क्षितीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “अंगात १०२ ताप अन्…”, कार्तिक आर्यनने सांगितला लंडनमधील शूटिंगचा किस्सा, म्हणाला, “३-४ गोळ्या घेऊन थंड पाण्यात…”

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”

सई ताम्हणकर सर्वप्रथम ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे कौतुक करताना लिहिते, “सर्वांचे मनोरंजन करणारा उत्तम चित्रपट…रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भूमिका फारच सुंदर केल्या आहेत. करण जोहर सर, तुम्ही अप्रतिम कलाकृती सादर केली आहे. आता मी आमच्या मौल्यवान रत्नाबद्दल सांगते. क्षिती… संपूर्ण चित्रपटात तू कमाल केली आहेस. या क्षणाला तुझा खूप जास्त अभिमान वाटत आहे. माझ्याकडून तुला घट्ट मिठी आणि खूप प्रेम!”

हेही वाचा : “प्रचंड नकारात्मकता…”, ‘इंद्रजीत’ फेम अभिनेत्याने ‘आदिपुरुष’च्या अपयशाबद्दल मांडले स्पष्ट मत; म्हणाला, “माझे नातेवाईक…”

सईप्रमाणे सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, क्षितीचा नवरा हेमंत ढोमे असा असंख्य मराठी कलाकारांनी या ‘रॉकी और रानी’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. सिद्धार्थ चांदेकरने सुद्धा क्षितीसाठी खास पोस्ट शेअर करत, “तुझा अभिमान वाटतोय…” असे म्हटले आहे.

हेही वाचा : “एवढी शिस्त…”, प्रवीण तरडेंनी सांगितला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभव; म्हणाले, “७ च्या शिफ्टला पहाटे साडेतीनला…”

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात क्षिती जोगने रॉकी रंधावाच्या आईची भूमिका साकारली आहे. यामध्ये क्षितीसह आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader