अभिनेत्री सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून दोघांची अरेंजवाली लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या अनुभवायला मिळणार आहे. खऱ्या आयुष्यात सई व सिद्धार्थ खूप चांगले मित्र आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत सईने सिद्धार्थ व मितालीच्या अफेअरबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
सई व सिद्धार्थने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, या मुलाखतीत सईने सिद्धार्थ व मितालीच्या अफेअरबाबत कळल्यानंतर काय वाटले याबाबतचा खुलासा केला आहे. सई म्हणाली “जेव्हा मी मिताली आणि सिद्धार्थचा पहिल्यांदा फोटो बघितला तेव्हा माझ्या तोंडातून ही.. असे उदगार बाहेर पडले होते. कारण- मी आणि मितालीनं ‘अनुबंध’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यावेळी मिताली खूप लहान होती. १० ते १२ वर्षांची मिताली मी पाहिली आहे. मला असं झालं की, हा काय योगायोग आहे? सिद्धार्थ आणि मितालीचे कुठे आणि कसं जमलं?”
सई पुढे म्हणाली, “मित्रांच्या बाबतीत असं असतं की, तू खूश आहेस ना? मग ठीक आहे. सिद्धार्थच्या बाबतीतही माझं नेहमीचं आहे. उद्या तो काही पाप जरी करून आला तरी मी त्याला पाठीशी घालेन. माझं प्रेम आहे त्याच्यावर. तुला ओके वाटलं ना हे मग ठीक आहे. मी तुझ्याबरोबर आहे. अशी मैत्री असल्यामुळे मी फार प्रश्न विचारले नाहीत. कारण- मी मितालीला ओळखत होते. तेव्हा ती लहान असली तरी आपल्याला माणूस कळतोच. त्यामुळे तू खूश आहेस ना आणि नक्की आहे ना एवढंच विचारलेलं.”
सई व सिद्धार्थच्या कामाबाबत बोलायचे झाले, तर आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘क्लासमेट’ चित्रपटात दोघे एकत्र झळकले होते. आता २ फेब्रुवारीला त्यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आदिती मोघे यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, विशाल मोढवे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.