चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचे अनुभव येतात. सिनेमामध्ये काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल असं त्यांना म्हटलं जातं. खासकरून नवख्या अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला काम मिळवायचं असेल तर अशा ऑफर दिल्या जातात. आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचे धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत. हिंदीसह मराठीमध्ये आपल्या अभिनयाने कामाचा ठसा उमटवणारी सई ताम्हणकरला कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सई ताम्हणकर गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिने फक्त मराठीच नाही तर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मराठी व हिंदी प्रेक्षकांची चाहती सईला कास्टिंग काउचसंदर्भात एक फोन आला होता, तो प्रसंग तिनेच सांगितला आहे. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सईला कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबाबत म्हणाली…

सई ताम्हणकरने सांगितला कास्टिंग काउचचा प्रसंग

सई म्हणाली, “खूप आधी मला एक फोन आला होता. अशी अशी भूमिका आहे, पण तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल. मी त्याला म्हटलं की हा मेसेज तू तुझ्या आईला फॉरवर्ड कर. तुझ्या बाबालाही पाठव. मला पुन्हा कधीच फोन किंवा मेसेज करू नकोस. १५-२० वर्षांत पहिल्यांदा आणि एकदाच असं घडलं होतं.”

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

“त्यावेळी कोण बसून काय मेसेज करतोय याची पडताळणी करणंही खूप कठीण होतं. अजूनही आपल्याला माहित नसतं की मेसेज करतेय ती व्यक्ती कोण आहे,” असं सई ताम्हणकर म्हणाली.

“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

सईने सांगितला प्रवासातील अनुभव

या मुलाखतीत सईने तिच्या घटस्फोटापासून ते मासिक पाळीसंदर्भात विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. सईला एकदा बसने प्रवास करताना वाईट अनुभव आला होता, तो प्रसंगही तिने सांगितला. सई सांगलीहून मुंबईला येत होती. त्यावेळी बसमध्ये तिच्या पाठीमागे बसलेल्या एका मुलाने तिचा दंडाजवळ पकडला होता. यामुळे घाबरलेल्या सईने त्याचा हात पकडून पिरगाळला होता आणि त्याला दम दिला होता.

सईच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती भूमी पेडणेकरच्या ‘भक्षक’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच ती ‘मटका किंग’ सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar recalls casting couch incident she was asked to sleep with someone for role hrc