अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सई आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. सई दीड दशकांहून जास्त काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिला काही वाईट अनुभव आला आहे का,असं एका मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर तिने प्रवासातील एक प्रसंग सांगितला.

सई ताम्हणकरने सिनेक्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा ती बसने सांगली ते मुंबई प्रवास करायची. तेव्हा बसमध्ये घडलेली एक धक्कादायक आता सईने सांगितली आहे. ‘हॉटर फ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत, स्त्यावर चालताना काही आयुष्यात कधी वाईट अनुभव आले आहेत का? असं विचारल्यावर सईने एक बसमधील तो प्रसंग सांगितला.

Sai Tamhankar on divorce party with Ex Husband
“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
nana patekar talks about wife neelkanti patekar
“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

सई म्हणाली, “मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा रात्री सांगलीतून बसमध्ये बसायचे आणि सकाळी मुंबईत पोहोचायचे. एकदा बसने प्रवास करत होते, माझ्या पाठीमागे एक मुलगा बसला होता, मागून एक हात माझ्या शरीराभोवती आला. त्याने माझा हात दंडाजवळ पकडला आणि मी घाबरले. मग मी त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि तो पिरगाळला. त्याला म्हटलं ‘भावा, पुन्हा तुझा हात इकडे आला तर तुला तुझा हात मोडलेला मिळेल’. मी घाबरत नाही कुणाला. तो ओरडला होता इतक्या जोरात मी त्याचा हात पिरगाळला.”

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

सईने मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचं नमूद केलं. “मुंबई खूप चांगलं शहर आहे. कारण तुम्ही रात्री प्रवास करत असाल आणि तुमच्याबरोबर असं काही घडलं, तुम्ही मदत मागितली तर लोक मदतीला येतात. लोक येऊन खरंच मदत करतात, ते व्हिडीओ शूट करतात असं नाही. मी तरी असं पाहिलेलं नाही, मी लोकांना मदत करताना पाहिलं आहे,” असं सई ताम्हणकरने सांगितलं.

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

दरम्यान, सई ताम्हणकरचा नुकताच ३८ वा वाढदिवस झाला. सईने तिच्या वाढदिवशी तिचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. तिच्या ब्रँडचं नाव ‘मॅडम एस’ ( Madame S ) आहे. “क्वीन ऑफ स्यासी ट्यूड” असा या नावाचा अर्थ होतो. आपला स्वभाव असा असल्याने ब्रँडसाठी हे नाव निवडलं असं सईने ही आनंदाची बातमी शेअर करताना सांगितलं.

सई ताम्हणकर झाली ‘बिझनेस वुमन’! वाढदिवसानिमित्त दिली आनंदाची बातमी, सुरू केला ‘हा’ व्यवसाय

सईच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती भूमी पेडणेकरच्या ‘भक्षक’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच ती ‘मटका किंग’ सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे.