सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष सर्वार्थाने खास ठरत आहे. येत्या काही महिन्यांत अभिनेत्री अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सईने नुकताच तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या दिवशी सईने तिच्या लाखो चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सई तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून ‘आवडेल ते बजेट’, ‘घ्या भडंग’ अशा वेगवेगळ्या शब्दांची पोस्ट शेअर करत होती. यामुळे येत्या काळात अभिनेत्री तिच्या चाहत्यांना काहीतरी खास सरप्राइज देणार याचा अंदाज प्रेक्षकांना आला होता. २५ जून रोजी म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सईने तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राइज दिलं आहे. तिने कपड्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.

aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024 : जपान आणि भारताची मैत्री कशी झाली? नेहरूंनी टोकियोच्या मुलांना ‘हत्ती’ भेट दिल्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला?
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?
pravin tarde birthday his wife snehal tarde
“भाईचा बर्थडे गाणं…”, प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहलची मिश्किल पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर प्रियाच्या हाती लागली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल, सायली-अर्जुनसमोर मोठं संकट, पाहा प्रोमो

आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांना भुरळ घालणाऱ्या सईने आता कपड्यांचं मर्चंडाइज लाँच केलं आहे. सईने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘मॅडम एस’ ( Madame S ) हा तिचा ब्रँड लाँच केला आहे. अभिनेत्रीच्या या नव्या व्यवसायाचं नाव अगदीच हटके आहे. या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. “क्वीन ऑफ स्यासी ट्यूड” असा या नावाचा अर्थ होतो. याबद्दल सांगताना सई सांगते, “कपड्यांचा ब्रँड सुरु करणं ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण, चाहत्यांच्या मनात नुसतं राहायचं नाही तर उरायचं आहे आणि या व्यवसायाच्या निमित्ताने मी हे करू शकते त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी हे रिटर्न गिफ्ट आहे.”

हेही वाचा : आमिर खानच्या मुलाचं नाव कोणी ठेवलं होतं? ‘जुनैद’चा अर्थ काय? अभिनेत्याने स्वतःच केलेला खुलासा

“आपल्या वाढदिवशी व्यवसाय सुरु करणं यासारखा दुसरा मुहूर्त नाही. या मर्चंडाइजला सगळेच खूप जास्त प्रेम देतील यात शंका नाही. मी फक्त कागदपत्रांवर उद्योजिका झाले आहे. पण, यापेक्षा तुम्हा सर्वांचं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. याला तुम्ही सगळेच भरभरून प्रेम द्याल आणि असंच काम करण्यासाठी प्रेरणा द्याल अशी आशा आहे. ब्रँडचं नाव काय असावं याचा प्रश्न माझ्या मनात नेहमीच होता. एका जवळच्या मित्राने माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं नाव सुचवलं आणि यामुळे मॅडम एस ( Madame S ) हे नाव ठेवण्याचा मी निर्णय घेतला. ‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’सारखा माझा स्वभाव आहे यावरूनच मर्चंडाइज नाव ठेवलं आणि आता हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे” असं सई ताम्हणकरने सांगितलं.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच सई नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये झळकणार आहे. याशिवाय तिच्याजवळ ‘ग्राउंड झिरो’, ‘अग्नी’, ‘डब्बा कार्टेल’ अशा बऱ्याच कलाकृती आहेत. अशातच अभिनेत्रीने नवा व्यवसाय लाँच करून एक नवीन भरारी घेतली आहे.