अभिनेत्री सई ताम्हणकर घटस्फोटित आहे. सईने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि ते अवघ्या दोन वर्षात विभक्त झाले. २०१५ मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला. सईच्या घटस्फोटाला आता नऊ वर्षे लोटली आहेत. सई व अमेय यांनी घटस्फोटानंतर पार्टी केली होती, त्या पार्टीची आजही चर्चा होते.

सई ताम्हणकरला नुकतंच एका मुलाखतीत त्या घटस्फोटाच्या पार्टीबद्दल विचारण्यात आलं. कोर्टातील वातावरण, मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी करणं याबाबत सईने माहिती दिली. “तुम्ही कोर्टात जाता, घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करता तेव्हा तुम्ही फार वेगळ्या परिस्थितीत असता. कोर्टात दोघांचंही मोठ्याने नाव घेतलं जातं, असं वाटतं जणू बाजारात आहोत. मी माझं नाव बदललं नव्हतं, पण तिथे ते सई ताम्हणकर गोसावी असं म्हणायचे. तुम्ही घटस्फोट घ्यायला जाता तेव्हा तुमचं लग्नाचं नावच तिथे घेतलं जातं,” असं सईने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Malkin Bai Written behind Car form Pune
प्रेम करावं तर पुणेकरांसारखं! मालकीणबाईसाठी काहीपण, Video Viral एकदा बघाच
pune video crowd at pune railway station
“निम्मं तरी पुणे रिकामे झाले” पुणे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी, Video होतोय व्हायरल
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

पुढे सई ताम्हणकर म्हणाली, “कोर्टातील या सगळ्या अनुभवानंतर थोडं चिल करायचं होतं, त्यामुळे आम्ही ड्रिंक्स घ्यायला बाहेर गेलो. तिथे रडारड झाली, थोडं प्रेमाने एकमेकांशी बोलणं आणि आयुष्यासाठी एकमेकांना सल्ले देऊन झालं. आमच्या घटस्फोटाबद्दल खूप जवळच्या मित्रांना माहrत होतं, त्यामुळे ते आमची विचारपूस करण्यासाठी फोन करत होते. ज्यांचे ज्यांचे फोन आले, त्यांना आम्ही दोघांनी ‘आम्ही इकडे आहोत, तुम्ही या’ असं सांगितलं आणि ८-१० लोक जमले. ते आल्यावर आम्ही दारू प्यायलो आणि चांगला वेळ घालवला.”

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

तुझी फसवणूक झाली होती का? यावर सई म्हणाली, “हो. मला वाटतं की लहान वयातच मी एक अत्यंत वाईट नात्यात होते आणि मी त्यातून खूप गोष्टी शिकले आहे.”

आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीला भेटत असल्याचं सईने आधीच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. “आजही मी त्याच्याशी बोलते. तसेच ज्या दिवशी दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन जेव्हा सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं. तसेच आमच्या घटस्फोटाबाबत सांगितलं. रात्रभर आम्ही दारू प्यायलो. एन्जॉय केलं. आमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा होता. त्याच्या नावाचे टॅटूही मी काढले आहेत. अजूनही ते टॅटू तसेच आहेत. एक वेळ अशी येते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता. मग त्या गोष्टीची लाज कसली? मग त्या आठवणी पुसून टाकण्यामध्ये काय अर्थ? म्हणूनही आजही ते टॅटू मी मिरवते,” असं सई ताम्हणकर म्हणाली होती.

Story img Loader